MarathiDevotion1 min read29 Jul 2026
हरी ॐ विठ्ठलं…
श्वासात विठ्ठलं, हृदयाच्या ठोक्यात विठ्ठलं. माझ्या आनंदात विठ्ठलं, माझ्या संकटात सोबती विठ्ठलं. “भिऊ नकोस,” म्हणते विठ्ठलं, पाठीशी माझ्या विटेवर उभं विठ्ठलं. भजनात गाते म
श्वासात विठ्ठलं,
हृदयाच्या ठोक्यात विठ्ठलं.
माझ्या आनंदात विठ्ठलं,
माझ्या संकटात सोबती विठ्ठलं.
“भिऊ नकोस,” म्हणते विठ्ठलं,
पाठीशी माझ्या विटेवर उभं विठ्ठलं.
भजनात गाते मी विठ्ठलं,
भक्तीच्या ओंजळीत विठ्ठलं.
ऊन-सावलीत विठ्ठलं,
हिरव्या वनात विठ्ठलं.
क्षणाक्षणात विठ्ठलं,
राहते माझ्या मनात विठ्ठलं.
रुक्मिणी मातेसोबती विठ्ठलं,
जसे माझे मायबाप विठ्ठलं.
वारीच्या फुलात विठ्ठलं,
वारकऱ्यांच्या डोळ्यांत विठ्ठलं.
पंढरीच्या पावलांत विठ्ठलं,
पंढरपुरात राहते माझे विठ्ठलं.
आषाढी एकादशीच्या दिवशी,
वारकऱ्यांना पाहून आनंदाने भावूक होते माझे विठ्ठलं.
नजरेस माझ्या आनंद होई,
पाहुनी माझे हरी विठ्ठलं.
मुख माझे अमृत होई,
गाऊनी विठ्ठलं.
प्रत्येक श्वास माझा गजर करी…
हरी ॐ विठ्ठलं…
हरी ॐ विठ्ठलं…
हरी ॐ विठ्ठलं…
GodVitthalSpiritual