MarathiLove2 min read04 Jul 2026
अबोल प्रीत
तू नाही बोललास काही तरी कळले तुझ्या मनातले तू नाही बोललास काही तरी प्रेम उमलले तुझ्या नजरेतले तुझी प्रीत ही साजिरी जसा सोनेरी प्रकाश तुझी साथ ही गोजिरवाणी जशी चांदणी रात
तू नाही बोललास काही
तरी कळले तुझ्या मनातले
तू नाही बोललास काही
तरी प्रेम उमलले तुझ्या नजरेतले
तुझी प्रीत ही साजिरी
जसा सोनेरी प्रकाश
तुझी साथ ही गोजिरवाणी
जशी चांदणी रात
रंगले तुझ्या प्रेमात, जणू सावली उन्हात
तू न बोलता काही
स्वर झुलले तुझ्या स्वरात
मनाचे ठोके तुझे ऐकू येत राही
तू नाही बोललास काही
तुझ्या मनाची मधुर कुजबुज
मला अलगद उमगत राही
तू नाही बोललास… तरी तुझे मन बोलत राही
तुझी नजर सांगते कहाणी… मी त्यात गुंतत जाई
तुझा स्पर्श होत नाही तरी
तुझे भास ह्या वेड्या मनास
कायम छेडत राही
तू आसपास नाही
तरी जाणवतोस काही
जणू श्वासात माझ्या
तू रुतलास असा की
लांब असुनीही… तू जवळच राही
अलगद मनाचे कोडे
तू सोडवणार नाही
तुझ्या मनातलं तू
कधी बोलणार नाहीस
पण मला न बोलता
सर्व कळत राही
न बोलता प्रेम करणारे
आपण जुई अन् जाई॥
Prem