MarathiLove1 min read04 Jul 2026
मोहिनी स्वर्गासम
धुंद आठवणींची रात, मंद बरसात, प्रेमाची चाहूल तिची, जसे स्वर्ग आले नभात भिजून वारा गेला, तिचा तो स्पर्श झाला, पाहुनी तिने मला, हृदयाचा हर्षसोहळा. किती सुंदर होती ती धुंद
धुंद आठवणींची रात,
मंद बरसात,
प्रेमाची चाहूल तिची, जसे स्वर्ग आले नभात
भिजून वारा गेला,
तिचा तो स्पर्श झाला,
पाहुनी तिने मला,
हृदयाचा हर्षसोहळा.
किती सुंदर होती ती धुंद आठवणींची रात,
बावऱ्या मनाची साथ,
नजरेची चाहूल तिची, आली कावेरी सागरात.
कोमलतेचं फुल माझ्या मनात उमललं आज,
प्रेमाचा पाऊस झाला… सांजवेळी साज.
का रे मिटू मी डोळे आज,
जेव्हा चंद्र समोर…तिचा निरागस नाज,
या बावऱ्या मनाचं काय करावं,
काय आहे रे इलाज?
पाहुनी तिला… वेडा पिसा,
झालो मी आज.
या बावऱ्या मनाचं काय करावं,
काय आहे रे इलाज?
सांजवेळी रंगते ही प्रेमाची बरसात,
एक ती, एक मी,
अशी दोघांची ही बात.
मोहिनी स्वर्गासम सुंदर होते आमुची साथ,
धुंद आठवणींची हीच ती रात.
NatureLove