MarathiLove1 min read03 Jul 2026
ओंजळ तुझ्या प्रेमाची
निसर्गाचे हे रूप वेगळे, तुझी साद मी तिला घालते… तुझ्या भिरभिरत्या स्पर्शाची… आस माझी मागते। लपावस तू त्या डोंगरापरीस, तुझ्या मनास मी शोधते। निसर्गाचे हे रूप वेगळे, तुझ
निसर्गाचे हे रूप वेगळे,
तुझी साद मी तिला घालते…
तुझ्या भिरभिरत्या स्पर्शाची…
आस माझी मागते।
लपावस तू त्या डोंगरापरीस,
तुझ्या मनास मी शोधते।
निसर्गाचे हे रूप वेगळे,
तुझी साद मी तिला घालते।
पानवेलीच्या ओंजळीत,
तुझी चाहूल मला लागते।
ह्या वेड्या मनास,
तुझी होण्याचं स्वप्न निसर्गाकडे मागते।
निसर्गाचे हे रूप वेगळे,
तुझी साद मी तिला घालते।
हिरवागार निसर्गामध्ये,
तुलाच पुन्हा पुन्हा मागते।
हिरवागार निसर्गामध्ये,
तुलाच पुन्हा पुन्हा मागते।
Love