Marathi2 min read03 Jul 2026
तुला जरा उशीरच झाला…
तुला जरा उशीरच झाला… प्रेमाचा हा खेळच सारा, सागराच्या लाटांत वाहून गेला, झाला तुला जरा उशीरच झाला… आलास तू जेव्हा, वेळही निघून गेली, सांजवेळी सावलीही सरून गेली… मी दुसऱ्याच
तुला जरा उशीरच झाला…
प्रेमाचा हा खेळच सारा,
सागराच्या लाटांत वाहून गेला,
झाला तुला जरा उशीरच झाला…
आलास तू जेव्हा, वेळही निघून गेली,
सांजवेळी सावलीही सरून गेली…
मी दुसऱ्याची होऊन गेले,
त्यांनी मला त्यांची अर्धांगिनी म्हणून स्वीकारले…
झाला तुला मात्र जरा उशीरच झाला…
नियतीचे मांडले होते डाव,
दिले मनाला नियतीनेच घाव…
शोधत होती नजर तुला,
पण नशिबात होते त्याचेच नाव…
ठेच लागली या मनाला,
वेळ बावरी लागते जीवाला…
डोळ्यांत होते सागर माझ्या,
मनात ओझे ह्या भरतीला…
झाला तुला जरा उशीरच झाला…
कसे सावरू ह्या मनाला…
वेदना पेटवती या काळजाला…
त्याची मी होऊन गेले,
तुझ्यापासून मी दूर झाले…
आता विसरुनी जा रे तू ह्या प्रेमाला,
तुझ्या प्रिय ह्या सखीला…
कर्तव्य आहे आता माझ्या ओंजळीला,
पार पाडेल वचन दिले मी…
लग्नाच्या साक्षीला… ✨
वचन दिले मी…
लग्नाच्या ह्या साक्षीला… ✨
Love