MarathiLove1 min read03 Jul 2026
नक्षत्र तुझ्या डोळ्यातलं
तुला पाहताना… रात धुंद मंद झाली, सोहळे सजले जसे, तुझी सोनरी चाहूल आली. नक्षत्राचं रूप तुझं… हृदयात बहार वेली, वार्याची झुळूक आली जशी… तू मिठीत सावली. डोळ्यांचा तुझा मंद सा
तुला पाहताना… रात धुंद मंद झाली,
सोहळे सजले जसे, तुझी सोनरी चाहूल आली.
नक्षत्राचं रूप तुझं… हृदयात बहार वेली,
वार्याची झुळूक आली जशी… तू मिठीत सावली.
डोळ्यांचा तुझा मंद साज,
वाहुनी त्यात मी आले,
स्वर्गगंगेच्या प्रवाहात,
धुंद मंद मी झाले.
तुझ्या नक्षत्राच्या डोळ्यांत मी सहज वाहून गेले,
तुझ्या स्पर्शाच्या धार्याने
मी धुंद मंद झाले.
तुला पाहताना… माझं मन
प्रेमसुरात धावून गेलं,
धडधडत्या या मनास
मी स्वतःला हरवून आले.
तुला पाहताना… रात धुंद मंद झाली,
सांजवेळी हे सख्या, मी तुझीच होऊन गेले…
सांजवेळी हे सख्या, मी तुझीच होऊन गेले…
Love