Marathi1 min read03 Jul 2026
ती ओली नजर…
ही पावसाळी संध्याकाळ तुझ्या लख्ख मिठीत सरावी… ही पावसाळी संध्याकाळ तुझ्या हाताच्या स्पर्शात निजावी… तुझ्या ओल्या डोळ्यात माझी नजर दिसावी तुझ्या केसांची ओली थेंब माझ्या गाल
ही पावसाळी संध्याकाळ
तुझ्या लख्ख मिठीत सरावी…
ही पावसाळी संध्याकाळ
तुझ्या हाताच्या स्पर्शात निजावी…
तुझ्या ओल्या डोळ्यात माझी नजर दिसावी
तुझ्या केसांची ओली थेंब माझ्या गालावर अलगद पडावी…
ही पावसाळी संध्याकाळ… अगदी सुरात बरसावी
भिजवून आपण दोघं… ही संध्याकाळ प्रेमात रंगावी
एक गोड असं गाणं गुणगुणावी…
ही पावसाळी संध्याकाळ… फक्त आपल्या प्रेमाची असावी
तू, मी, पाऊस… आणि आपलं प्रेम —
यांनी सजवावी ही संध्याकाळ… फक्त आपल्या प्रेमाची असावी
ही पावसाळी संध्याकाळ… फक्त आपल्या प्रेमाची असावी…
Love